महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल सज्ज- राठोड

फोटो
फोटो

नांदेड : पोलिस विभागाचे दामिनी पथक व गस्तीवर असलेले पोलिस आणि त्यातच नव्याने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीच्या माध्यमातून रोडरोमीयोंवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. महिला, विद्यार्थीनींसह नांदेडकरांच्या सुरक्षेसाठी पोलिस दल सज्ज असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी सांगितले. 

यशवंत महाविद्यालयात आयोजीत केलेल्या विद्यार्थीनींच्या संरक्षणासाठी (सेफ्टी वुमेन) मार्गदर्शन शिबीरात श्री. राठोड बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, दामिनी पथक प्रमुख फौजदार नमिता देशमुख, प्रा. डॉ. प्रतिमा बंडेवार, प्रा. डॉ. मिरा फड,  प्रा. डॉ. कविता सोनकांबळे, प्रा. डॉ. पद्माराणी राव यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गर्दीच्या व खासगी शिकवणी, महाविद्यालय परिसरात गस्त 

पुढे बोलतांना श्री. राठोड म्हणाले की, शहरात मागील काही दिवसापूर्वी रस्त्यावरून पायी किंवा ॲटोतून जाणाऱ्या एकट्या महिलांना गाठून किंवा ॲटोच्या कडेला बसलेल्या महिलेच्या हातातील मोबाईल किंवा पर्स लंपास केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातील गुन्हेगारांना आम्ही त्यांची जागा दाखवून दिली आहे. परंतु पोलिस गस्त वाढवून दामिणी पथक शहरात गर्दीच्या व खासगी शिकवणी, महाविद्यालय परिसरात गस्त घालत असते. त्यामुळे अनेक रोडरोमियोंना आपला रस्ता बदलावा लागला. असे गुन्हेगार पोलिसांच्या तावडीत सापडले तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा असे आवाहन श्री. राठोड यांनी विद्यार्थीनी व महिलांना केले. आपल्या सुरक्षेची जबाबदारी नांदेड पोलिसांची असून आपण शहरात निर्भयपणे संचार करू शकता. विद्यार्थनीनी छेडखान होत असले तर थेट आमच्या फौजदार नमिता देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले. 

यांनीही केले मनोगत व्यक्त 

यावेळी फौजदार निमिता देशमुख, उपप्राचार्य डॉ. उत्तम सावंत, प्रा. श्री. बंडेवार, प्रा. कविता सोनकांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या मार्गदर्शन शिबिराला प्रा. डॉ. अजय गव्हाणे, प्रा. डॉ. बोडखे, प्रा. संगिता ढेंगळे, प्रा. ढाणकीकर, डॉ. मंजुश्री देशमुख, प्रा. अर्चना गिरडे, प्रा. वाघ, प्रा. बालाजी भोसले, प्रा. अंजली गोरे यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी उपस्थित होते. 

हातउसणे पैसे मागितल्याने भोसकले

नांदेड : हातउसणे दिलेले पैसे परत का मागितलास म्हणून चक्क एकाने मित्रालाच चाकुने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शहराच्या रामनगर पाटीजवळ सोमवारी (ता. सहा) दिपारी तीन वाजता घडली. उपचारानंतर जखमीने दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी (ता. सात) गुन्हा दाखल करण्यात आला. 

शहराच्या शारदानगर परिसरातील नंदीग्राम हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या गजानन संजय दवणे (वय १९) याने आपल्या मित्राला काही कामानिमित्त हातउसणे पैसे दिले होते. परंतु बऱ्याच दिवसांनी मित्र पैसे परत देत नसल्याने त्याला त्यांने विनंती केली. मात्र तो कशाचे पैसे म्हणून त्याच्यासोबत वाद घालत होता. यावरून सोमवारी (ता. सहा) दुपारी रामनगर पाटीजवळ खोब्रागडेनगरमध्ये राहणारा व पैसे घेतलेला मित्र आला असता त्याला गजानन दवणे याने दिलेले हातउसणे पैसे मागितले. परंतु कशाचे पैसे म्हणून चक्क गजानन दवणे याच्या पोटात त्याने चाकुने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

येथे क्लीक करा नांदेडात अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद
 
विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा


त्यानंतर घटनास्थळावरून पसार झाला. त्यानंतर जखमीच्या नातेवाईकांनी त्याला शासकिय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याने विमानतळ पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्याने आपल्या अर्जात नमुद करून फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरुन विमानतळ पोलिस ठाण्यात एकाविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या हाती लागला नाही. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. जाधव करीत आहेत.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com