Ausa News : वर्दीतील अधिकारी अन्‌ स्वच्छतेचा सेवेकरी; कुमार चौधरींचा ज्ञान पंढरीकडून गौरव

‘माझा औसा, स्वच्छ औसा, सुंदर औसा’ अभियानासह शैक्षणिक उपक्रमांची दखल; उत्कृष्ट अधिकारी मेडल जाहीर.
Police Officer Kumar Chaudhary

Police Officer Kumar Chaudhary

sakal

Updated on

औसा - पोलिस अधिकारी म्हणून कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडतानाच सामाजिक बांधिलकी जपत ‘माझा औसा, स्वच्छ औसा, सुंदर औसा’ अभियानाच्या माध्यमातून शहराच्या स्वच्छतेसाठी जनजागृती करणारे औसा उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चौधरी यांचा ज्ञान पंढरी ग्रुपच्या वतीने गौरव करण्यात आला. केंद्र सरकारकडून पोलिस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘उत्कृष्ट अधिकारी मेडल’ जाहीर झाल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com