Shrikant Bhalerao
sakal
कायगाव - गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथील गोदावरी नदीत उडी घेऊन जीवन संपविण्याच्या प्रयत्नात असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे गंगापूर पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत प्राण वाचवले. डायल ११२ वर आलेल्या तातडीच्या कॉलनंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेत मुलाला सुरक्षित ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी (ता. १० ) गोदावरी नदी पुलावर घडली.