Police Raid : पाथरीतील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्रीनंतर गुटखा तस्करी करणारा ट्रक आणि १५ लाख ९२ हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला. या कारवाईत एकूण २० लाख ९७ हजार रुपये मूल्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पाथरी : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्रीनंतर पाथरी परिसरातील ढालेगाव शिवारात केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा व वाहतूक करणारा ट्रक जप्त केला. या कारवाईत १५ लाख ९२ हजारांच्या गुटख्यासह एकूण २० लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.