Santosh Deshmukh Case : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना सांत्वन दिले आणि आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीड : संतोष देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर आरोपींना फाशी झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो न्याय दिला जायचा, तसाच न्याय दिला जाईल, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले.