
बीड : आरोग्य क्षेत्रातील प्रत्येक पॅथीची गरज आणि महत्त्व अधोरेखित आणि स्वतंत्र आहे. पण, आता सरकारच्या निर्णय आणि धोरणाच्या गोंधळामुळे दोन पॅथी आमने-सामने आल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मसी’ पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना अॅलोपॅथी उपचारासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी देता यावी, या शासन निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिल्याने वैद्यकीय क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.