
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून २४ तास उलटण्याच्या आत जिल्ह्यातील शिवसेना व भाजपच्या नेत्यांना मंत्रिपदाचे वेध लागले. गेल्यावेळी हातातोंडाशी आलेली संधी हुकल्याने संजय शिरसाट यांनी आपला दावा मजबूत केला; तर शेवटच्या क्षणी निवडून आलेल्या अब्दुल सत्तार यांनाही मंत्रिपदाची आशा आहे.