Gram Panchayat Election: राजकीय वर्चस्वासाठी होणार लक्षवेधी लढती

अविनाश काळे
Friday, 25 December 2020

उमरगा तालुक्यात ग्रामपंचायतीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व आहे. त्यापाठोपाठ शिवसेना व भाजपाचेही काही ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे.

उमरगा (उस्मानाबाद) : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची रणधूमाळी सुरू झाली असून इच्छूक नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या धावपळीत आहेत. निवडणूकीसाठी सर्वाधिक मतदाराची संख्या गुंजोटी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून सर्वात कमी मतदार संख्या गणेशनगरची आहे. 

उमरगा तालुक्यात ग्रामपंचायतीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे वर्चस्व आहे. त्यापाठोपाठ शिवसेना व भाजपाचेही काही ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. तर बऱ्याच ठिकाणी स्थानिक पातळीवरील आघाडीचे वर्चस्व आहे. आता पुन्हा पाच वर्षानंतर होणाऱ्या निवडणूकीची खिंड लढविण्याची तयार सुरू झाली असून इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी 'ऑनलाईन' च्या प्रतिक्षेत आहेत.

सर्वाधिक मतदार गुंजोटीत

तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ९० हजार ७८१ मतदार संख्या असून त्या स्त्री मतदार संख्या ४२ हजार ६५३ तर पुरुष मतदार संख्या ४८ हजार १२७ आहे. गुंजोटीत सर्वाधिक सात हजार २७४ मतदार संख्या असून सहा प्रभागासाठी निवडणूक होत आहे. तर सर्वात कमी ३०८ मतदार संख्या गणेशनगर ग्रामपंचायतीची आहे. 

दरम्यान ग्रामपंचायतनिहाय मतदार संख्या, कंसात प्रभाग संख्या : 

सावळसुर एक हजार ११४ (तीन), भिकार सांगवी ७१७  (तीन), जकेकूर दोन हजार ५२३ (चार), कदमापूर / दुधनाळ एक हजार २७ (तीन), कदेर तीन हजार ९३५ (पाच), तुरोरी पाच हजार ९३४ (सहा), व्हंताळ एक हजार ३७८ (तीन), दाळींब सहा हजार २२४ (सहा), तलमोड दोन हजार ४७१ (चार), बलसूर चार हजार ४५९ (पाच), बेडगा दोन हजार १३० (तीन), पेठसांगवी तीन हजार २११ (पाच), मूळज पाच हजार ३२९ (पाच), कोळसूर कल्याण ७४४  (तीन), कराळी एक हजार १५६ (तीन), बाबळसूर ६९४ (तीन), कवठा तीन हजार २१५ (चार), समुद्राळ एक हजार ११६ (तीन), नाईचाकूर तीन हजार ७७० (पाच), दाबका एक हजार ४४ (तीन), एकोंडी जहागीर एक हजार ४३७ (तीन), कुन्हाळी दोन हजार ३६२ ( चार), वागदरी एक हजार ६४ (तीन), कोळसूर गुंजोटी ६८७ (तीन), रामपूर एक हजार १५७ (तीन), जगदाळवाडी ९४९ (तीन), जकेकूरवाडी एक हजार ८७ (तीन), गणेशनगर ३०८ (तीन), दगडधानोरा/मानेगोपाळ एक हजार ६३७ (तीन), गुरुवाडी/चंडकाळ ९१० (तीन), काळानिंबाळा एक हजार ४५२ (तीन), सुपतगांव एक हजार ३०० (तीन), गुगळगांव एक हजार ५५९ (तीन), हिप्परगाराव एक हजार ४५० (तीन), गुंजोटी सात हजार २७४ (सहा), नाईकनगर मुरूम ४४५ (तीन), बोरी ९५२ (तीन), पळसगांव ८६० (तीन), मूरळी एक हजार ४० (तीन), नागराळ गुंजोटी ८०४ (तीन), जवळगा बेट एक हजार ३७८ (तीन), आष्टा जहागीर एक हजार १२३ (तीन), चिंचकोटा ८३१  (तीन), डिग्गी दोन हजार २४९ (चार), कडदोरा एक हजार ८२ (तीन), मातोळा ६०४ (तीन), थोरलेवाडी ६९६ (तीन), हंद्राळ ६५८ (तीन), भगतवाडी एक हजार २३४ (तीन).

राजकीय वर्चस्वासाठी होणार लक्षवेधी लढती

तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असलेल्या नेतेमंडळींच्या गावात राजकीय वर्चस्वासाठी लक्षवेधी लढती होतील. गुंजोटी, तुरोरी, दाळींब, बलसूर, नाईचाकूर, मुळज, कुन्हाळी, आष्टा जहागीर, सुपगगांव व कवठा ग्रामपंचायतीवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकीयदृष्ट्या शक्ती पणाला लावली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारांची पारखं केली जात असून स्थानिक राजकारणाच्या डावपेचात पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: political news Umarga Gram Panchayat Electionpolitical news Umarga Gram Panchayat Election