

Discipline First: Inspector Maruti Munde Transferred After Controversial Political Speech
देगलूर : एका राजकीय कार्यक्रमातील भाषण आणि त्यावेळी गणवेशात दिलेल्या ‘निवडणूक शुभेच्छां’ची चर्चा अखेर देगलूरच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीपर्यंत पोहोचली. काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिस अधिकाऱ्याने राजकीय व्यासपीठावरून व्यक्त केलेल्या शुभेच्छांवरून विविध स्तरांतून टीका होताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी तत्काळ दखल घेत श्री मुंडे यांची नांदेड येथे बदली केली.