Farmers Loss : चार महिन्यांचे डाळिंबाची अडीचशे रोपे उपटून फेकली.! फुलंब्रीतील शेतकऱ्याचे नुकसान
Fulambri Incident : फुलंब्री येथील शेतकरी देवराव राऊत यांच्या चार महिन्यांच्या डाळिंब लागवडीतील अडीचशे रोपे अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री मुळासकट उपटून टाकल्याने मोठे नुकसान झाले आहे.
फुलंब्री : फुलंब्री - खुलताबाद रस्त्यावरील शेतकरी देवराव राऊत यांनी लागवड केलेले चार महिन्याचे सुमारे दोनशे ते अडीचशे डाळिंबाची रोपे रविवारी (ता.आठ) रोजी मध्य रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने मुळासकट उपटून टाकली.