
मुनाफ शेख
आडुळ : गेल्या काही वर्षांपासून पैठण तालुका डाळींब उत्पादनात जिल्हयात अग्रस्थानी आला असुन येथील खेर्डा प्रकल्पामुळे बालानगर, पारूंडी, तुपेवाडी, खादगाव, खेर्डा, ववा, वडाळा, तांडा बुद्रुक सह परिसरातील शेती समृद्ध झाली आहे. डाळिंब उत्पादनामुळे येथील शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडली आहे," असे संभाजीनगर जिल्हयाचे खासदार संदीपान भुमरे यांनी सांगितले ते पारूंडी (ता. पैठण येथे शुक्रवारी (ता. २७ ) रोजी आयोजित डाळिंब शेतकरी मेळावा व चर्चासत्रात मार्गदर्शना बोलत होते.