
बीड : उन्हाळ्यात टंचाई असल्याने टॅंकरने पाणी घातले. बहारही चांगला आणि फळांनी बागेतील डाळिंबाची झाडे लगडून गेली. मात्र, चोरट्यांनी रात्रीतून हात साफ करावे तसे सर्व सात एकरांमधील बागेतील डाळिंब तोडून नेले. मात्र, चोरी गेलेल्या मालाचे वजन आणि किंमत ठरवायची कशी असा कळीचा मुद्दा समोर आल्याने गुन्हा नोंद झालेला नाही.