
छत्रपती संभाजीनगर : राज्यात दोन जूनपासून वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी सुरू झालेल्या प्रशिक्षणाचे नियोजन इतके बिघडले आहे, की शिक्षकांना मानहानीकारक परिस्थितीतून जावे लागत आहे. ‘शिक्षक सशक्तीकरणा’च्या नावाखाली त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय थांबविण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.