औरंगाबाद पूर्व : भाजपचे राज्यमंत्री अतुल सावे 7,933 मतांनी पिछाडीवर | Election Results 2019

गफ्फार कादरी, अतुल सावे
गफ्फार कादरी, अतुल सावे

औरंगाबाद - पूर्व विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात सर्वाधिक तब्बल 34 उमेदवार मैदानात आहे. पहिल्या फेरीत एमआयएमचे डाॅ. गफ्फार कादरी हे 7996 मतांनी आघाडीवर असून, अतुल सावे यांना केवळ 63
 मते मिळाली आहेत.  2014 प्रमाणे खरी लढत ही भाजपचे अतुल सावे आणि एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी यांच्यात होत आहे. या शिवाय समाजवादी पार्टीचे कलीम कुरैशी, कॉंग्रेसने पाठींबा दिलेले अपक्ष उमेदवार युसूफ मुकाती, बसपचे किशोर म्हस्के हे मैदानात आहेत. 

मागील निवडणुकीत एमआयएमचा चार हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता. त्यामुळे त्यांनी प्रचंड जोर लावलेला असला तरी 13 मुस्लिम उमेदवारांत होणारी मतविभागणी
त्यांच्यासाठी डोकेदुःखी आहे. 

औरंगाबाद पूर्व :

  • कादरी 7996
  • अतुल सावे  63
  • कलिम कुरेशी 404
  • किशोर मस्के 34

 
अशी आहे पूर्व विधानसभा मतदासंघाची पार्श्‍वभूमी 
 
1995 पुर्व विधानसभा मतदारसंघ आणि फुलंब्री एकत्र होता. तेव्हा भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे 49 हजार 496 मते घेऊन विजयी झाले होते. तर कॉंग्रेसच्या उमदेवार पार्वती सिरसाट या 31 हजार 698 मते घेऊन दुसऱ्या तर कैशवराव औताडे हे 27 हजार 131 मते घेत तिसऱ्या स्थानी होते. यावेळी एकुण 21 उमेदवार रिंगणात होते. 

1999 मध्ये भाजपने पुन्हा पुर्व मध्ये बाजी मारली होती. बागडे 65 हजार 596 मते घेऊन विजयी झाले होते. तर कॉंग्रेसतर्फे केशवराव औताडे 48 हजार 823 मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुधाकर सोनवणे यांनी 17 हजार 783 मते घेतली होती. यावेळी आठ उमेदवार रिंगणात होते.  2004 मध्ये सतत तीन वेळा विजयाची श्रृंखलेत असलेले हरिभाऊ बागडे यांना पराभव स्विकारावा लागला होता. त्यांना कॉंग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी 97 हजार 278 मते घेतली
होती. तर 88 हजार 968 मते घेऊन बागडे दुसऱ्या स्थानी होते. त्यावेळी बारा उमेदवार रिंगणात होते. यात अपक्ष उमेदवार मिर्झा नासेर बेग यांनी 4 हजार 592 तर श्रीराम पवार यांना 2 हजार 165 मते मिळाली होती. 2009 मध्ये पुर्व आणि फुलंब्री स्वतंत्र मतदारसंघ झाला. यावेळी एकुण 28 उमेदवार रिंगणात होते. यात कॉंग्रेसच्या उमेदवारांने बाजी मारली. तर
भाजपचे डॉ. भागवत कराड हे 32 हजार 965 मते घेऊन दुसऱ्या स्थानी होते. यात अपक्ष उमेदवार सुभाष झांबड यांनी 17 हजार276 तर मोहम्मंद जावेद महोम्मद इसाक यांनी 12 हजार 276 मते घेतली होती. 2014 पुर्व मतदारसंघात 30 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अतुल सावे हे 64 हजार 528 मते घेऊन विजयी झाले होते. तर
एमआयएमचे उमेदवार डॉ गफ्फार कादरी हे 60 हजार 268 मते घेऊन दुसऱ्यास्थानी होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com