लग्नाच्या तारखाही पुढे ढकलल्या...!

file photo
file photo

परभणी : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात लग्न तारखाही पुढे ढकलण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्यास प्रतिसाद मिळाला असून गुरुवारी (ता. १९) या महिन्यातील सर्वात मोठी लग्नतिथी होती. परंतु, विषाणूच्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने केल्या आवाहनाला प्रतिसाद देत वधू - वर पित्यांनी तारखा पुढे ढकल्याचा निर्णय घेतला आहे. याचा विपरीत परिणाम मंगल कार्यालये व त्याला जोडून येणाऱ्या अन्य व्यवसायांवर पडला आहे. जवळपास एकट्या परभणी शहरात दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

परभणी शहरात ३० मंगल कार्यालये आहेत. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सरासरी दोन चांगली मंगल कार्यालये आहेत. गुरुवारी (ता. १९) या महिन्यातील सर्वात मोठी लग्नतिथी होती. त्यामुळे परभणी शहरातील सर्व ३० मंगल कार्यालये आरक्षित होती. त्याच बरोबर काही मंदिरे व मोकळ्या जागेतही लग्नाचे आयोजन केलेले होते. परंतु, प्रशासनाने कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी करणे टाळावे, असे आदेश दिले होते. तसेच जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयांच्या मालक व व्यवस्थापकांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरातील ३० मंगल कार्यालयांतील विवाह सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन ते अडीच कोटीचे नुकसान 
लग्नतारखा पुढे ढकलल्या गेल्याने याचा आर्थिक फटका वधू - वर पित्यांसह मंगल कार्यालये व त्याला जोडून येणाऱ्या वेगवेगळ्या व्यवसायांवर दिसून आला आहे. एकट्या परभणी शहरात जवळपास दोन ते अडीच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

१९ च्या तारखा पुढे ढकल्या...
ता. १९ मार्च रोजी होणारे लग्न सोहळे रद्द करण्याचे आदेश आम्हाला जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे आम्ही ता. ३१ मार्चपर्यंत आरक्षित केलेल्या सर्व लग्न सोहळ्याच्या तारखा रद्द केल्या आहेत. वधू - वर पित्यांनीदेखील आम्हाल सहकार्य केले आहे.
- शंकर आजेगावकर, मंगल कार्यालय मालक असोसिएशन, परभणी
.......
हेही वाचा...

चैत्र पालखी सोहळा रद्द
परभणी : पंढरपुरात भरणाऱ्या प्रमुख यात्रांपैकी एक असणारा परभणी ते पंढरपूर रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर चैत्र पालखी सोहळा या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आला आहे.
या पालखीचे प्रस्थान परभणी येथून ता. २१ मार्च रोजी होणार होते. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे पालन करत या वर्षीचा पालखी सोहळा रद्द करण्यात येत आहे. यात्रेत सहभागी होणारे वारकरी, भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रंगनाथ महाराज ट्रस्टचे अध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार व्यंकटराव कदम, अॅड. न. चि. जाधव, माधवराव पांगरकर, दत्तराव मालेगावकर, दत्तराव शेळके व पालखी सोहळ्याचे संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com