Dr. Tanaji Sawant
sakal
- धनंजय शेटे
धाराशिव : जिल्हा परिषदेतील सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वक्तव्यावरून मिळत आहेत. जिल्हा परिषदेत सदस्यांना दुय्यम वागणूक देऊन मनमानी कारभार केला जात असेल, तर तो सहन केला जाणार नाही. गरज पडल्यास अवघ्या सहा महिन्यांत सत्तेची समीकरणे बदलून दाखवू, असा आक्रमक इशारा सावंत यांनी परंडा येथे दिला. त्यांच्या या विधानामुळे जिल्हा परिषदेतील राजकीय संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.