Parli Power Station
sakal
परळी वैजनाथ - वाढत्या तापमानामुळे राज्यातील वाढत्या विजेच्या मागणीला परळी वैजनाथ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने मोठा आधार दिला असून केंद्रातील संच क्रमांक सहाने गेल्या १२५ दिवसांत एकदाही बंद न पडता सलग चालून ५५५.३९ मिलीयन युनिट विजेची निर्मिती करून विक्रम प्रस्थापित केला आहे.