नांदेड :शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 concern Nanded farmer

नांदेड :शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

नांदेड : शेतकऱ्यांकडून सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी (डाय अमोनिअम फॉस्फेट) या खताच्या किंमतीत दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे. नांदेडला पीपीएल (पॅरादिप फॉस्फेट लि.) कंपनीचा एक हजार टन डीएपी नांदेडसाठी प्राप्त झाला. या खताची एमआरपी एक हजार ३५० रुपये आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता डीएपीसाठी दीडशे रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.

साडेआठ लाख खरिपातील पेरणी क्षेत्र असलेल्या नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक डीएपी खताची मागणी असते. सर्वच पिकांसाठी संतूलीत खत म्हणून शेतकरी डीएपी खताला पसंती देतात. सोयाबीन, कपाशी, उडीद, मुग, तूर, हरभरा, गहू या हंगामी पिकासह केळी, ऊस, हळद या बागायती पिकांना डीएपीचा सर्रास वापर होतो. दरम्यान, मागील काही वर्षापासून या खताच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. अशातच कृषी विभागाकडून शेतकर्‍यांना डीएपी ऐवजी इतर संयुक्त खताचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. परंतु वाढत्या किंमतीमुळे डीएपीचा वापर कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे दर वाढल्यामुळे रासायनिक खतांचे दर वाढणार अशी शक्यता व्यक्त होत होती. तसेच युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळेही खते महागणार असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत होते. यामुळे शेतकऱ्यांनी यापूर्वीच खते घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले होते.अशातच सोमवारी (ता. पाच) नांदेडला पीपीएल (पॅरादिप फॉस्फेट लि.) कंपनीचा एक हजार टन डीएपी प्राप्त झाला.

या डीएपीच्या गोणीवर एक हजार ३५० एमआरपी दिसून आला आहे. यामुळे हे खत एक हजार दोनशे रुपयेऐवजी एक हजार ३५० रुपयांनी विक्री होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. याबाबत पीपीएल कंपनीच्या विक्री प्रतिनिधीशी संपर्क केला असता नवीन डीएपीची विक्री किंमत एक हजार ३५० रुपये असल्याचे सांगीतले. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिगोणी दीडशे रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत.

अस्मानी, सुलतानी संकटाचा सामना करणारे आम्ही शेतकरी अडचणीत असताना डीएपीची दरवाढ झाल्याने उत्पादन खर्चात अधीकच भर पडणार आहे. दरवाढीबाबत सरकारने फेरविचार करावा.

- शिवाजी पाटील,शेतकरी पळसगाव,ता. नायगाव जि. नांदेड

Web Title: Ppl Company Increase Concern Nanded Farmers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top