esakal | बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे महाशिवरात्री महोत्सव रद्द

बोलून बातमी शोधा

Vaidyanth Mandir Parli}

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साजरा केला जातो.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे महाशिवरात्री महोत्सव रद्द
sakal_logo
By
प्रवीण फुटके

परळी वैजनाथ (जि.बीड) : येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ महाशिवरात्री महोत्सव कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा रद्द करण्यात आला असून ८ ते १६ मार्च दरम्यान वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये भाविकांना दर्शनासाठी  बंद करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी शनिवारी (ता.०६) आदेशाद्वारे कळवले आहे.


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महाशिवरात्री महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील लाखों शिवभक्त या महोत्सवा दरम्यान दर्शनासाठी शहरात येत असतात. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.त्याच बरोबर पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते, यादरम्यान यात्रा भरते. पंचक्रोशीतील भाविक भक्तपरंपरेनुसार या यात्रेसाठी येत असतात. तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्र महोत्सवाची तयारी सुरू करण्यात आली होती.

यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर अनेक बैठकाही घेण्यात आलेल्या होत्या. मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी पायऱ्यावर बँरेकेटची व्यवस्था करण्यात येत होती. यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक धार्मिक कार्यक्रम, महोत्सव, लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रम यांना बंदी घालण्यात आली आहे. यामुळे गुरुवारी (ता.११) साजरा होणारा महाशिवरात्री यात्रा महोत्सव रद्द करण्यात आला असून सोमवार (ता.८) ते मंगळवार (ता.१६) पर्यंत भाविक भक्तांची गर्दी होवू नये म्हणून दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरासह जिल्ह्यातील सर्व शिवालये बंद करण्यात आले. असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Edited - Ganesh Pitekar