
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या मध्य मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत विद्यमान आमदार तथा महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी बाजी मारली आहे. हिंदू मतांमध्ये २०१४ प्रमाणे फाटाफूट होऊन जैस्वाल यांना फटका बसणार, असा अंदाज बांधला जात होता; पण हा अंदाज मतदारांनी खोटा ठरविला.