esakal | प्रशांत चेडेंनी बांधले शिवबंधन
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई ः कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांनी शिवसेनेत समर्थकांसह प्रवेश केला. या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, शंकर बोरकर आदी.

समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश, कॉंग्रेसला खिंडार 

प्रशांत चेडेंनी बांधले शिवबंधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी (जि. उस्मानाबाद) ः कॉंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर प्रशांत चेडे यांनी मंगळवारी (ता. तीन) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे शिवबंधन बांधून समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यातील कॉंग्रेसला मोठी खिंडार पडणार असून, शिवसेनेची प्रामुख्याने परंडा विधानसभा मतदारसंघात ताकद वाढणार आहे.


जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हा संपर्कप्रमुख शंकर बोरकर यांच्या उपस्थितीत श्री. चेडे व त्यांच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सर्वांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. 
मुंबई येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात श्री. चेडे यांच्याबरोबर कॉंग्रेसचे वाशी तालुकाध्यक्ष बिभीषण खामकर, भूम तालुकाध्यक्ष अण्णासाहेब देशमुख, परंडा तालुकाध्यक्ष सुभाषसिंह सिद्दीवाल, भूमचे माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, महादेव अंधारे, वाशीचे नगराध्यक्ष नितीन चेडे, उपनगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, गटनेते प्रसाद जोशी, कॉंग्रेसचे वाशी तालुका उपाध्यक्ष श्‍यामराव शिंदे यांच्यासह कॉंग्रेसचे नगरसेवक, पंचायत समितीचे उपसभापती विष्णू मुरकुटे, सुनील जाधवर, छगनराव मोळवणे, शिवशक्ती सहकारी साखर कारखान्याचे कॉंग्रेसचे संचालक, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व समर्थकांनी शिवसेनेत शिवबंधन बांधून प्रवेश केला आहे.


परंडा विधानसभा मतदारसंघात श्री. चेडे यांना मानणारा मोठा वर्ग असून, प्रामुख्याने वाशी शहरासह तालुक्‍यात मोठे प्राबल्य आहे. श्री. चेडे यांनी आपल्या समर्थकांसह ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन धनुष्यबाण हाती घेतल्याने या विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणिते बदलणार आहेत. 

loading image
go to top