Jalna Crime : प्रेयसीच्या चिमुकलीवरही अत्याचार केल्याचे उघड; प्रशांत वाडेकर विरोधात पुन्हा गुन्हा
Sexual Assault : प्रेमिकेच्या सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेला प्रशांत वाडेकर याने तिच्या चार वर्षांच्या मुलीवरही अत्याचार केल्याचे समोर आले. जालना पोलिसांनी मंगळवारी याप्रकरणी गुन्हा नोंदवला.
जालना : प्रेयसीच्या सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत वाडेकर याने तिच्या चार वर्षांच्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. याप्रकरणी कदीम जालना ठाण्यात मंगळवारी (ता. आठ) गुन्हा नोंदविण्यात आला.