गल्लीत रहायला आल्यावरुन डोक्‍यात खुपसला चाकू (वाचा काय घडलं पुढे)

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

मिसारवाडी येथे राहणारे परवेज शेख यांना "तु आमच्या गल्लीत राहण्यासाठी कसा काय आला' असे म्हणत शिवीगाळ करून शहारुख गफ्फार, फारुख या दोघांनी मारहाण केली तर एकाने चाकू त्यांच्या डोक्‍यात चाकू खुपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : आमच्या गल्लीत किरायाने राहण्यासाठी का आला म्हणत डोक्‍यात चाकू खूपसून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी सोमवारी फेटाळला. फारुख खान गफ्फार शहा (21) गफ्फार शहा हुसेन शहा (50) अशी त्या आरोपींची नावे आहेत. 

हेही वाचा- शेतकऱ्यांना डोकेदुखी : पोर्टलवर गावांची नावेच गायब

मिसारवाडी येथे राहणारे परवेज शेख यांना "तु आमच्या गल्लीत राहण्यासाठी कसा काय आला' असे म्हणत शिवीगाळ करून शहारुख गफ्फार, फारुख या दोघांनी मारहाण केली तर एकाने चाकू त्यांच्या डोक्‍यात चाकू खुपसून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परवेज शेखने मोबाईलवरुन शेख लाला शेख पटेल यांना माहिती दिली. ही माहिती मिळताच शेख लाला आणि त्यांचा लाहन मुलाने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी कोणीतरी धावत येत असल्याचे पाहून घटनास्थळावरून पळ काढला. शेख लाला शेख पटेल यांच्या तक्रारीवरुन फारुख व गफ्फार या दोघांविरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून त्या दोघांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला. 

क्लिक करा-राज्यभर गाजलेल्या या घोटाळ्याचा लागलाय निकाल; आरोपीवर तब्बल 175 कोटींचे कर्ज 

गुन्हा केल्यापासून आहेत फरार 
सदर अटकपूर्व जामीनवर सोमवारी (ता. 23) जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. सोळुंके यांच्यासमोर सुनावणी झाली असता सहायक लोकअभियोक्ता राजू पहाडीया यांनी गुन्हा घडल्यापासून हे दोघे फरार आहेत. त्यांना ताब्यात घेतल्याशिवाय तपास पूर्ण होणार नाही, ते दोघ एकाच वस्तीमध्ये राहतात, त्या दोघांना जामीन दिला तर ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात त्यामुळे त्याना जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती केली. 

हे वाचलंत का?-भारतीय कापूस निगमला न्यायालयाने का बजावली नोटीस? (वाचा सविस्तर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pre-arrest bail rejected matter of assailants