
छत्रपती संभाजीगनगर : मराठवाड्यात पंधरा दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पाऊस सुरूच आहे. गुरुवारी देखील धाराशिव, परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. धाराशिव शहरासह जिल्ह्यात दररोज पाऊस होत आहे. गुरुवारी (ता. २९) शहरात दुपारी दीडच्या सुमारास अर्धातास पाऊस झाला.