पाचोड - आठ दिवसापासून मान्सूनपूर्व पावसांतच सत्तर गावाची तहान भागविणाऱ्या एकाहत्तर टँकरचे चाके रुतल्याने पैठण तालुक्यातील एकाहत्तर गावांत निर्जळी निर्माण होऊन नागरिकांवर पाणी मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहवयास मिळते.
टँकरच्या खेपास दांडी मारणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल व ज्या ठिकाणी रस्त्याची अडचण आहे. ते तात्काळ दुरुस्त करून अडचण सोडविण्याच्या सुचना पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी दिल्या.