
परभणी : मे महिन्याच्या उत्तरार्धात मॉन्सूनपूर्व पावसाने परभणी जिल्ह्यात थैमान घातले असून, जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. सोमवारपर्यंत (ता. १९) पर्यंत झालेल्या पावसामुळे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ आणि पूर्णा या सात तालुक्यांतील एकूण ४३६.९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने व्यक्त केला.