Tiger Attack : वाघाच्या हल्यात दुभती गाभण गाय ठार तर एक गंभीर जखमी

वाघाने गोठ्यातील एका गायीची शिकार तर एक दुभती गाभण गाय गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
Tiger Attack
Tiger Attacksakal
Updated on

येरमाळा - कळंब तालुक्यातील मलकापूर येथे बुधवारी (ता. १२) वाघाने गोठ्यातील एका गायीची शिकार तर एक दुभती गाभण गाय गंभीर जखमी केल्याची घटना घडली. शेतकरी संतोष लोमटे गुरुवारी सकाळी धार काढण्यासाठी गेले सदरील प्रकार समोर आला.

वनविभागाला सदरील घटनेची माहिती देताच वनविभागाचे गस्त पथक पुण्याची रेस्क्यू टीम मलकापूर शिवारात दाखल झाली. वाघानेच गायीची शिकार केल्याचा अंदाज आल्याने वाघाला रेस्क्यू करण्याची तयारी केली असुन, वाघाला पकडण्यासाठी सापळा लावला असुन गेल्या अनेक दिवसांपासून गुंगारा देणारा वाघ वनविभागाच्या तावडीत सापडणार का याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले.

मलकापूर (ता. कळंब) येथील शेतकरी बुधवारी रात्री संतोष सर्जेराव लोमटे बुधवारी रात्री शेतातून गाईच्या धाराकाढून घरी आले. गुरुवारी सकाळी गाईच्या धारा काढण्यासाठी गेले असता गोठयातील दोन गाई जखमी अवस्थेत दिसल्या एक गाय नरड्याचा चावा घेतल्याने ठार झाली. तर एक गाय नरड्याला चावा घेतल्याने जखमी झाल्याचे दिसले.

सदरील घटना गावातील ग्रामस्थ्यांना सांगून वनविभागाला माहिती देऊन जखमी गाईवर दहिफळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्रथमोपचार करुन गाईची अन्नानालिका निकामी झाल्याने गाय गाभण असल्याने पुढील उपचारासाठी पाठवण्यात आली. संतोष लोमटे यांचे एक गाय ठार तर एक जखमी झाल्याने दीड लाख रुपयाचे नुकसान झाले.

येडशीच्या अभयारण्यात गेल्या दोन महिन्यापासून वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघाचे दर्शन झाल्यापासुन वाघाला रेस्क्यू करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेऊन गेल्या दोन महिन्यापासून वनविभाग वाघ दिसल्याची माहिती मिळेल त्या ठिकाणी जाऊन वाघाला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत असून आज पर्यंत वाघाने वनविभागाला दिला आहे.

मलकापूर येथील घटनेची माहिती वनविभाग अधिकाऱ्यांना मिळताच येडशी अभयारण्याचे वन्यप्राणी वनपरिक्षेत्रपाल ए. डी.मुंडे,वनविभाग भूम परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल दीपक गांधले वनरक्षक सतीश साळुंके, बालाजी ससाने, गजानन दांडगे, संकेत टाके, सागर जगताप, प्रमोद कांबळे, वनसेवक भारत काकडे सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन परिसरात टेहळणी करुन वाघानेच गाईची शिकार केल्याचा अंदाज आल्याने पुण्याच्या रेस्क्यू टीम आणि वनविभागाने दिवसभर वाघाला रेस्क्यू करण्यासाठी मचान उभारण्याचे काम केले.

रेस्क्यू टीम वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्याला गेल्या दोन महिन्यापासून सतत गुंगारा दिला असून मलकापूर शिवारात आज लावलेल्या रेस्क्यू टीमच्या सापळ्यात आज वाघ येणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या दोन महिन्यापासून वनविभाग पुण्याची रेस्क्यू टीम आणि वाघ यांच्यात सुरू असलेल्या लपंडाव आज यशस्वी होईल का? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असले तरी वाघाचे वास्तव्य आजही आपल्या भागात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेती पिकते कधी पिकत नाही पिकली तरी शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे उदरनिर्वाह चांगला चालावा म्हणून खवा व्यापाऱ्याकडून उचल घेऊन दुग्ध व्यवसायासाठी गाई घेतल्या गाईचे पैसे फिटने बाकी असून गाई वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याने माझ्यावर संकट ओढावले आहे.

- संतोष सर्जेराव लोमटे, दुग्ध व्यवसायिक शेतकरी मलकापूर तालुका कळंब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com