
अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग व प्रसूती विभागात मृत घोषित केलेले अर्भक नंतर जिवंत असल्याचे आढळले. या प्रकाराने विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला. या घटनेच्या चौकशीसाठी दोन समित्या नेमल्याची माहिती प्रभारी अधिष्ठातांनी दिली. दरम्यान, अर्भकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.