Maha Shivaratri 2025 : महाशिवरात्री यात्रेची औंढ्यात जय्यत तयारी; २४ फेब्रुवारीपासून सुरवात
Aundha Nagnath : औंढा नागनाथ मंदिर परिसरात महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. रंगरंगोटी, रोषणाईसह विविध सजावट कार्ये सुरू असून, २४ फेब्रुवारीपासून यात्रा महोत्सवाची सुरवात होणार आहे. उत्सव १ मार्चपर्यंत चालेल.
हिंगोली : जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. प्रभू नागनाथाच्या मंदिर परिसराची रंगरंगोटी, रोषणाईची कामे केली जात आहेत. सोमवारपासून (ता. २४) यात्रा महोत्सवाला सुरवात होणार आहे. यात्रा ता. एक मार्चपर्यंत चालेल.