Marathi Language : ग्रामीण शब्द होणार ‘कोश’बद्ध..! ‘मसाप’चा पुढाकार; मराठवाड्यातील ३० अभ्यासक घेताहेत नोंदी
Old Marathi : मराठवाड्यातील ग्रामीण बोलीभाषेतील जुने शब्द लुप्त होऊ नयेत म्हणून ‘मसाप’ने ग्रामीण शब्दकोश तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ३० अभ्यासक हे शब्द संकलित करत आहेत.
लातूर : मराठवाड्यातील बोलीभाषेत इंग्रजी शब्दांचा शिरकाव वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक जुने मराठी शब्द हळूहळू लुप्त होत आहेत. पण, ग्रामीण भागात अजूनही सहजपणे जुने मराठी शब्द बोलले जातात.