
टाकरवण : मकर संक्रांतीचा सण जवळ आला की आंबट-गोड चवीच्या गावरान बोरांचा हंगाम सुरू होतो. परंतु, गेल्या काही वर्षांत गावरान बोरांची चव दुर्मिळ होत चालली आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे पूर्वी शेताच्या बांधावर हमखास असणारी बोराची झाडे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. एकीकडे गावरान बोरांची मागणी वाढत असली तरी ते पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. ८० ते शंभर रुपये किलो असे या गावरान बोराचे दर आहेत.