बीड जिल्ह्यातील बर्दापूर आठवडी बाजारात भाजीपाल्याचे दर शंभरी पार! पावसाळ्याच्या तोंडावर ग्राहकांच्या खिशाला झळ

अंबाजोगाई तालूक्यातील बर्दापूर आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दर शंभरी पार गेले आहेत.
prices of vegetables increased in Bardapur weekly market in Ambajogai taluk marathi News
prices of vegetables increased in Bardapur weekly market in Ambajogai taluk marathi News
Updated on

बर्दापूर ,ता .१४ (गोविंद सुर्यवंशी) : मागील काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत असला तरी मागील दोन महिन्यापूर्वी कडक उन्हाळ्यात लागवड केलेल्या भाजी पाल्याला भाव आला आहे. अंबाजोगाई तालूक्यातील बर्दापूर आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दर शंभरी पार गेले आहेत. काही दिवसाच्या तुलनेत आज बाजारात भाजी पाल्याच्या दरात वाढ झालेली दिसत आहे.

दोन महिन्यापूर्वी विहीर व बोरच्या थोडे फार पाण्यावर काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली होती. मागील काही दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पण मागील काही दिवसांपासून विहीरीचे व बोरचे पाणी कमी झाले पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांना भाजी पाला पिकवण्यासाठी कसरत करावी लागली. परिणामी शेतकऱ्याकडून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक जवळपास कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ सुरु झाली. आठवडी बाजारात पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाल्याचे भाव कडाडले असून भाजीपाल्याचे भाव शंभरी पार गेले आहे .

असे आहेत आठवडी बाजारातील भाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर

लसून - २०० रूपये किलो

आले -१६० रूपये किलो

कोथिबीर - १५० रुपये किलो

हिरवी मिरची - १२० रुपये किलो

फूलगोबी - १५० रूपये किलो

टोमॅटो - १०० रूपये किलो

भेंडी - ८० रुपये किलो

गवार - ८० रूपये किलो

लिंबू - ८० रूपये किलो

वांगी - ७० रूपये किलो

कांदा - ४० रुपये किलो

बटाटे - ५० रुपये किलो

शेवगा - ८० रूपये किलो

दोडका - १५० रुपये किलो

आठवडी बाजारातील भाज्यांचे दर प्रतिकिलो या दराप्रमाणे विकला जात आहे .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com