Prickly Water Lily Rate : ओय मखाना...! दर पोचले १२०० रुपये किलोवर, मागणी वाढल्याचा परिणाम

Prickly Water Lily Fruit : मखानामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे याच्या सेवनाने टाइप-२ मधुमेहामध्ये फायदा होतो.
Prickly Water Lily Rate
Prickly Water Lily RateSakal
Updated on

Prickly Water Lily : मखाना हे अतिशय आरोग्यदायी ड्रायफ्रूट आहे. यात जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि फॉस्फरसदेखील भरपूर आहेत. त्यामुळे मखाना खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, यंदा याचे दर १ हजार २०० रुपये ते १ हजार ४०० रुपये किलोवर गेले आहेत. किलोमागे ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली आहे.

मखानामध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाण चांगले असते, त्यामुळे याच्या सेवनाने टाइप-२ मधुमेहामध्ये फायदा होतो. पचनसंस्था मजबूत करण्यासाठी आणि पोटाचे आजार दूर करण्यासाठी मखाना फायदेशीर मानला जातो. दुधात मखाना उकळून त्याचे सेवन केल्यास हाडे आणि स्नायू मजबूत होतात.

वजन कमी करण्यातही मखाना महत्त्वाची भूमिका बजावते. यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे पटकन पोट भरते आणि भूक कमी करते. जे वजन कमी करण्यास मदत करते. जेव्हा शरीरात फ्री रॅडिकल्स वाढू लागतात, ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवू लागतो. पण जर तुम्ही दुधात भिजवलेले मखाना खाल्ले तर तुमचा थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

मखानाला म्हणतात ‘काटेरी कमळ’!

लहान काटेरी झुडपामुळे मखानाला ‘काटेरी कमळ’ असेही म्हणतात. एप्रिल महिन्यात मखानाच्या झाडाची फुले दिसू लागतात. झाडांवर ३-४ दिवस फुले राहतात. दरम्यान, वनस्पतींमध्ये बियाणे बनण्याची प्रक्रिया सुरू होते.

एक ते दोन महिन्यांत बियाणे फळांमध्ये बदलू लागतात. जून-जुलैमध्ये फळे २४ ते ४८ तास पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगतात. फळ काटेदार असते. काटे निघून जाण्यास एक ते दोन महिने लागतात.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेतकरी पाण्याच्या खालच्या पृष्ठभागावरून मखाना फळ गोळा करतात आणि त्यानंतर प्रक्रिया केली जाते. बिया उन्हात वाळवल्या जातात. मखानाच्या फळाचे आवरण खूपच कडक असते. ते उच्च तापमानाला गरम केले जाते आणि त्याच तापमानात ते हातोडीने तोडले जाते आणि लावा बाहेर पडतो, त्यानंतर त्याच्या लावामधून विविध पदार्थ आणि खाद्यपदार्थ तयार केले जातात.

बिहारमध्ये ९० टक्के उत्पादन...

मखानाचे ८० ते ९० टक्के उत्पादन एकट्या बिहारमध्ये होते. मिथिलांचलमध्ये ७० टक्के उत्पादन होते. सुमारे १ लाख २० हजार टन बियाणे मखानातून ४० हजार टन लावा उपलब्ध होतो. मखानाला सामान्यपणे ‘कमळाचे बी’ म्हणून ओळखले जाते. २००२ मध्ये दरभंगा येथे राष्ट्रीय मखाना संशोधन केंद्र स्थापन केलेले आहे.

आरोग्यासाठी मखाना चांगले डायफ्रूट आहे. लोकांना याची जास्त माहिती नव्हती. आता माहिती झाल्यामुळे मागणीही वाढली. दरभंगा बिहार येथून मखाना येतो. मखाना एक्स्पोर्ट होत असल्यामुळे अमेरिकेत मखानाचे दर जवळपास ३० हजार रुपये किलो आहेत.

— सुदर्शन सुराणा, विक्रेता.

मखानामध्ये अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते, हाडे मजबूत करण्यासाठी मखाना फायदेशीर मानला जातो. पचनक्रियादेखील चांगली राहते. याशिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचे कामदेखील मखाना करते. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवते. हाडे मजबूत बनवते तसेच वजन कमी करण्यासाठी मदत होते.

— डॉ. अलका कर्णिक, आहारतज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com