Loksabha2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात खोटारडा माणूस : प्रकाश आंबेडकर 

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar

कनेरगाव नाका ( जि. हिंगोली ) : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात खोटारडा माणूस असल्‍याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी (ता.8) येथे केली.

हिंगोली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्‍या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी उमेदवार मोहन राठोड, वंचित आघाडीचे जिल्‍हाध्यक्ष अॅड. रवि शिंदे, एमआयएमचे जिल्‍हाध्यक्ष बुऱ्हाण पहेलवान, पक्ष निरीक्षक रवि मोरे पाटील, भारिपचे जिल्‍हाध्यक्ष वसीम देशमुख, अण्णाराव पाटील आदी उपस्‍थित होते.

यावेळी अॅड. आंबेडकर पुढे म्‍हणाले, निवडणुकीपूर्वी सरकार सत्तेवर आल्‍यानंतर जनतेच्‍या खात्‍यात पंधरा लाख रुपये देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले. मात्र अद्यापही हा पैसा जनतेच्‍या खात्‍यात आला नाही. काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी 72 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र ते देखील जनतेला फसवत आहेत. राहूल गांधींना गरजूंचा एवढाच पुळका होता तर सत्तेत असताना हे का सुचले नाही असा सवाल त्‍यांनी केला. 

भारताने पाकिस्‍तानचे एफ-16 विमान पाडल्‍याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आहेत. तीन दिवसापूर्वीच पाकिस्‍तानने सर्व विमाने सुरक्षित असल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे मोदींचा दावा खोटा असल्‍याचा आरोप त्‍यांनी केला. या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी मन की बात केली नाही तर ते मौन बाळगून आहेत. त्‍यावरूनच पंतप्रधान मोदी खोटारडा माणूस आहे हे स्‍पष्ट होते. 

देशाला चीन व पाकिस्‍तानकडून धोका आहे. त्‍यामुळे त्‍या देशातील वस्‍तूंवर बंदी घालून त्‍यांची आर्थिक कोंडी केली पाहिजे.सरकारने खरेदी केलेल्‍या रॅफेल विमानांचे सुटे भाग भारतात तयार होणार नसतील तर ही विमाने पुढील काळात भंगारात जातील. याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाहीत. राहूल गांधी देखील बोफोर्समुळे राफेलवर बोलायला तयार नसल्‍याचे आरोप त्‍यांनी केला. 

देशात सरकारच्‍या उदासिनतेमुळे वीस लाख टन अन्नधान्य वाया जात आहे. मात्र हे धान्य उपाशीपोटी झोपणाऱ्या का दिले जात नाही असा सवालही त्‍यांनी केला. रोजगार हमी योजनेच्‍या कामावरील मजुरांना तीनशे दिवस रोजगार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा त्‍यांनी व्यक्‍त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com