Nillod News : स्वतंत्र फार्मर कार्ड छापणे बेकायदेशीर; कार्ड अनधिकृत असल्याचे कृषी विभागाचे स्पष्ट निर्देश, राज्यातील सीएससी केंद्रांना सूचना देण्याचे आदेश

ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दा 'दैनिक सकाळ'ने १६ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्तातून मांडला होता.
farmer id

farmer id

sakal

Updated on: 

- महेश रोडे

निल्लोड - ॲग्रीस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडीच्या नावाखाली शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असल्याचा मुद्दा 'दैनिक सकाळ'ने १६ ऑक्टोबर रोजी प्रकाशित केलेल्या वृत्तातून मांडला होता. फार्मर आयडीच्या आधारे तयार करून दिल्या जाणाऱ्या स्वतंत्र छापील कार्डाला अधिकृत मान्यता नसल्याचा मुद्दाही या वृत्तातून उपस्थित करण्यात आला होता. या वृत्ताची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महत्त्वाचे पत्र काढून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पावले उचलली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com