Police right canal of Jayakwadi Damsakal
मराठवाडा
Paithan News : जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या कैद्याने जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात उडी मारुन संपविले जीवन
दक्षिण जायकवाडी येथे असलेल्या खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या एका ३२ वर्षीय कैद्याने जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली.
पैठण - येथील दक्षिण जायकवाडी येथे असलेल्या खुले कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असणाऱ्या एका ३२ वर्षीय कैद्याने जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यात उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. १६) घडली. सुभाष रमेश केंगार रा.केशवनगर मुंढवा जि. पुणे असे या आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.
