private bus fire in accident
sakal
लासूर स्टेशन (ता. गंगापूर) - ‘पहाटे साडेतीनच्या सुमाराला आम्ही गाढ झोपेत होतो. अचानक काही तरी जोरात आदळल्याचे जाणवलं. त्यामुळे जोरदार धक्का बसला, पाच मिनिटे काय झालं, ते काहीच कळालं नाही.
एवढ्यात बसच्या समोरील भागाने पेट घेतलेला दिसताच आमच्या काळजात धस्स झालं. समोर मृत्यू ‘आ’ वासून उभा असल्याचं जाणवलं अन् सारेच भयभीत झाले. आगीने रौद्ररूप धारण करण्यापूर्वी प्रसंगावधान राखून आम्ही आपत्कालीन खिडकीकडे पळालो.