रुग्णांकडून बिलाच्या नावावर लूट सुरु, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार कधी थांबणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

3Hospital_20Bill

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांची संख्या आता वाढु लागली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखाने देखील फुल्ल होत असल्याने त्याचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. याचा विचार करुन प्रशासनाकडुन यावर अत्यंत कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

रुग्णांकडून बिलाच्या नावावर लूट सुरु, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रकार कधी थांबणार?

उस्मानाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांची संख्या आता वाढु लागली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखाने देखील फुल्ल होत असल्याने त्याचा गैरफायदा घेण्याचेही प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. याचा विचार करुन प्रशासनाकडुन यावर अत्यंत कटाक्षाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या उपचार घेतलेल्या रुग्णाची बिले लाखाच्या पुढे जात असल्याचे चित्र आहे. मग अशावेळी लेखापरीक्षकांची नियंत्रण समिती नेमक काय करत आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्ह्यामध्ये ज्या खासगी रुग्णालयांना कोरोना कोविड सेंटर म्हणून मान्यता दिलेली आहे. त्या ठिकाणी बिलावर नियंत्रण राहवे यासाठी लेखापरीक्षकांच्या तपासणीचा पर्याय शासनाने निवडला होता. मात्र लाखाच्या पुढे कित्येक लोकांच्या बिलाची रक्कम जात असतानाही त्याला कोणताही प्रतिबंध होत नसल्याचे दिसुन येत आहे. तक्रारींची वाट पाहण्यापेक्षा स्वतः लेखापरीक्षक व जबाबदारी महसुलच्या अधिकाऱ्यांनी यावर पुढे येऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. त्यातही महसुलच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

विद्यार्थ्यांनो परिक्षेसाठी निवडा पर्याय ! ऑनलाईन, ऑफलाईनचे वेळापत्रक ही घ्या...

लेखापरीक्षक दर आठवड्याला तपासणी करत असल्याचे सांगण्यात येत असल्याने त्याकडे अधिक गांभीर्याने पाहिल्याचे आजवरच्या स्थितीवरुन दिसत आहे. अनेक ठिकाणी अव्वाच्या-सव्वा बिले स्विकारले जात असल्याचे सांगुनही तिकडे कानाडोळा होत असल्याने या व्यवस्थेबाबत शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी प्रशासनाकडुन आता बिलाच्या आजवरच्या लेखापरीक्षणावर लक्ष देऊन शासनाने ठरवुन दिल्याप्रमाणेच बिले स्विकारली आहेत की जादा रक्कम घेतली आहे. त्याची तपासणी होण्याची गरज आहे.

आजोबांकडे ठाण्याहून आलेल्या नातवाचे अपहरण, काही तासांतच पोलिसांनी काढले शोधून

सामान्य लोकांच्या खिशाला चाप लावून कोरोनासारख्या संकटातही माणुसकी विसरुन काही दवाखाने बिले वाढवून घेत असल्याच्या जाहीर तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची आता जास्त आवश्यकता निर्माण झाली आहे. यापुढील काळात कोरोनाच्या रुग्णाचे प्रमाण अधिक वाढणार असल्याची शक्यता व्यक्त होत असल्याने बेडची कमतरता जाणवणार असाही तर्क लढविला जात आहे. अशावेळी अजून काही खासगी दवाखान्यामध्ये कोरोनाच्या उपचाराची सुविधा उपलब्ध करण्याची तयारी प्रशासनाकडुन केली जाणार आहे. त्यामुळे या काळात सामान्य नागरिकांच्या अडचणीचा गैरफायदा उचलण्याचा रुग्णालयाकडुन प्रयत्न होऊ शकतो. ज्या रुग्णालयाच्या बाबतीत अधिक तक्रारी आहेत, किमान त्या ठिकाणच्या बिलाबाबत निश्चितपणाने तपासणी होण्याची आवश्यकता आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Web Title: Private Hospitals Take Over Charges Patients Osmanabad News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Osmanabad
go to top