हिंगोली : औंढा ते वसमत मार्गावर असलेल्या वगरवाडीजवळ सोमवारी ता. सात चालत्या खाजगी प्रवासी बस ने अचानक घेतला पेट घेतला, आगीत बस जळून खाक झाली. मात्र प्रवासी सुखरूप आहेत.
औंढा नागनाथ ते वसमत राज्य रस्त्यावर औंढा नागनाथ तालुक्यातील वगरवाडी जवळ कर्नाटक राज्यातील जमकंडी जिल्हा बिजापूर येथून खाजगी यात्रा कंपनीची बस क्रमांक एमएच ०४ जीपी १२९७ ही बस ४० महिला पुरुष प्रवासी घेऊन औंढा नागनाथकडे येत असताना या बसने सोमवार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वगरवाडी जवळ अचानक पेट घेतला. पाठीमागे धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच चालकाने बस थांबवून प्रवासी खाली उतरवले.
यामुळे बसमधील ४० महिला पुरुष प्रवासी बाल बाल बचावले आहेत माहिती मिळताच औंढा नागनाथ नगरपंचायतच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
परंतु आगीने रोद्ररूप धारण केले यामध्ये प्रवासी नागरिकांचे कपडे, पैसा व सर्व साहित्य जळून खाक झाले. यादरम्यान नांदेड कडून औंढा जिंतूर टी पॉइंट मार्गे छत्रपती संभाजी नगरकडे जाणारी व छत्रपती संभाजी नगरकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक दीड तास विस्कळीत झाली होती.
यादरम्यान पोलिस निरीक्षक जीएस राहिरे, उपनिरीक्षक अफसर पठाण, साह्यक पोलीस निरीक्षक पंजाब थिटे, जमादार संदीप टाक गजानन गिरी माधव सूर्यवंशी, सुभाष जयताडे, खयामुद्दीन खतीब घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक थांबवली व आग विझवल्यानंतर वाहतूक सुरळीत केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.