जेवळी (ता. लोहारा) - येथील अभियंता, संशोधक प्रा. सिद्रामाप्पा धरणे यांना भारत सरकारच्या वतीने दिले जाणारा राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) पुरस्कार व जागतिक बौद्धिक संपदा संघटना (डब्ल्यूआयपीओ) राष्ट्रीय पुरस्कार २०२४ देऊन गौरव करण्यात आला आहे.
भारत सरकारच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयकडून दिले जाणाऱ्या हा प्रतिष्ठेचा पुरस्कार असून एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. बुधवारी (ता.२६) नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. प्रा. धरणे यांनी संशोधन करताना सर्वाधिक म्हणजे २५ पेटंट स्वतःच्या नावावर नोंदवले असून ५५ पेटंट संशोधने मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
जेवळी (ता. लोहारा, जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेले प्रा. सिद्रामाप्पा शिवाशंकर धरणे हे एम.ई. सिव्हिल असून त्यांचे आज पर्यंत एकूण ८० पेटंट नोंदणीकृत आहेत. यापैकी आतापर्यंत विविध क्षेत्रातील एकूण २५ संशोधनासाठी व आठ डिझाईनसाठी भारत सरकारकडून पेटेंट प्राप्त झाले आहे.
त्यांच्या संशोधनाबद्दल विविध क्षेत्रातील अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. २०१७ मध्ये यू.ए.ई. या देशाकाडून 'वॉटर अँड एनर्जी एक्सलन्स अवॉर्ड' ने त्यांना सन्मानित करण्यात असून गेल्या वर्षी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी बोलावून गौरवण्यात आले होते. असे उत्तुंग यश प्राप्त झालेले या भागातील ते एकमेव संशोधक आहेत.
त्यांचे नवोपक्रम हे व्यक्तीचे राहणीमान, अर्थव्यवस्था आणि संपूर्ण राष्ट्राच्या विकासाशी संबंधित असून पाणी, अक्षय ऊर्जा, शेती, भूकंप प्रतिरोधक संरचना आणि संरचनात्मक घटक, क्रीडा इत्यादींच्या शाश्वततेशी संबंधित आहेत.
ते ग्रामीण भागात रोजगारक्षमता निर्माण करतात, तसेच स्टार्टअप्स, एनजीओ, संस्थांची ताकद वाढवतात आणि मोठे उद्योजक बनण्याची क्षमता ठेवतात. तसेच सर्व नवोपक्रम आणि पेटंट विविध निधी संस्था आणि सरकारकडून निधीच्या संधी निर्माण करतात.
बुधवारी (ता. २६) नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात भारत सरकारच्या वाणिज्य आणि व्यापार मंत्रालयाच्या वतीने दिले जाणारा राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) पुरस्कार व जागतिक बौद्धिक संपदा संघटना (डब्ल्यूआयपीओ) राष्ट्रीय पुरस्कार २०२४ हे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आला.
यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती प्रतिभा मनिंदर सिंग व मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी हा पुरस्कार प्रा. सिद्रामाप्पा शिवशंकर धरणे यांच्या वतीने प्रत्यक्ष भाचा शिवराज माळगे यांनी स्वीकारला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार असून एक लाख रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
भारत सरकारकडून हा राष्ट्रीय बौद्धिक संपदा (आयपी) पुरस्कार दरवर्षी व्यक्ती, संस्था, संस्था आणि उपक्रमांना त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी, ओळखण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी प्रदान केले जातात. हे पुरस्कार भारतातील आयपी इकोसिस्टम मजबूत करण्यात आणि नाविन्य आणि सर्जनशीलता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.