
परभणी : ‘अनंत जन्मीचे पुण्य फळास आले’ या उक्तीला साक्ष देणारी एक भक्तिमय वाटचाल परभणी शहरात साडेचार वर्षांपासून नियमितपणे अनुभवली जात आहे. निमित्त आहे ते प्राध्यापक मित्रांच्या उपक्रमाचे. प्रा. अतुल गडम, प्रा. दिलीप घुंबरे, प्रा. संभाजी सवंडकर, प्रा. ज्ञानेश्वर डव्हळे, प्रा. प्रवीण वायकोस, प्रा. सचिन देशमुख, प्रा. विष्णू नवपुते आदी सुमारे अकरा मित्रांनी मिळून सुरू केलेली दरमहा पंढरपूर वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नसून, ती एका भावनिक, आध्यात्मिक, सामाजिक परिवर्तनाची वाटचाल म्हणून ओळखली जात आहे.