Jayakwadi Water : जायकवाडीच्या पाण्यासाठी आज घेराव आंदोलन
Water Crisis : परभणी जिल्ह्यात जायकवाडी जलाशयातील पाणी पूर्ण क्षमतेने सोडावे, या मागणीसाठी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज घेराव आंदोलन होणार आहे.
परभणी : जायकवाडी जलाशयातून परभणी जिल्ह्यातील टेलपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी घेऊन शिवसेनेचे खासदार संजय जाधव सोमवारी (ता. १७) शहरातील जायकवाडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कार्यालयास शेकडो कार्यकर्त्यांसह घेराव घालून टाळे ठोकणार आहेत.