Beed News : सासुरा येथील संत एकनाथ महाराज मठ ट्रस्टमध्ये आर्थिक अनियमिततेचा आरोप करत आंदोलकांनी झाडावर चढून टाळाच्या भजनाने आंदोलन छेडले. विश्वस्तांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली.
बीड : सासुरा (ता. केज) येथील संत एकनाथ महाराज मठ संस्थानमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत शुक्रवारी (ता. सहा) आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढून भजन गायले. तर, महाराजांसह विश्वस्तांनीही पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली.