Beed News: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांची उन्हात होतेय होरपळ; रस्ते रुंदावले, पण गरिबांची सावली मात्र हरवली; प्रशासकीय अनास्था दूर होणार तरी कधी?

Lack of Shade and Basic Facilities for Poor Protesters: बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना आंदोलक उन्हात होरपळत आहेत. रस्ते रुंदावले तरी गरिबांना सावलीसाठी जागा नाही
Beed News

Beed News

esakal

Updated on

बीड: ती रखरखती दुपार... पारा ३६ अंशांच्या पार गेलेला आणि अंगाची लाहीलाही होत होती. अशातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दाम्पत्य आजूबाजूला पडलेली वाळलेली लाकडे, झाडांचे फंटे आणि दोरखंड गोळा करण्यात मग्न होते. पाहणाऱ्याला वाटले असेल की हे सरपण गोळा करत आहेत, पण सत्य त्याहून अधिक वेदनादायी होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com