
जालना : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध जिल्ह्यांत मोर्चे निघत आहेत. जालन्यातही शुक्रवारी (ता. १०) जनआक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातून लाखोंच्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली.