परराज्यातील कामगारांना भोजनासह निवारा द्या

korona virus desease logo.jpg
korona virus desease logo.jpg

नांदेड : लॉकडाऊनच्या आदेशामुळे जिल्ह्यातील झालेले उद्योग व्यवसाय, साखर कारखाने, बाजार समितीतील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापीत कामगार यांच्या स्थलांतरामुळे लॉकडाऊन व सोशल डिस्टन्स उपाययोजनांच्या मानकांचे उल्लंघन होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे त्यांच्या निवारागृह, अन्नधान्य व भोजनाची व्यवस्था संबधीत उद्योग व्यवसायांनी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी सोमवारी दिले.

कामगारांचे स्थलांतर झाल्यास जबाबदार धरणार
लॉकडाऊनच्या आदेशामुळे जिल्ह्यातील झालेले उद्योग व्यवसाय, साखर कारखाने, बाजार समितीतील प्रभावीत झालेले कामगार, परराज्यातील विस्थापीत कामगार स्थलांतर करताना आढळल्यास त्याची जबाबदारी संबधीतावर राहिल. यासाठी कामगार सुरक्षा नेमावे असे आदेशीत केले आहे. या कामगाराची वैद्यकीय तपासणी तसेच औषधोपचाराची सोय करावी, यात दिरंगाइ केल्याचे आढळल्यास कारवाइ करण्याचा इशारा दिला आहे.

कलम १४४ मधून वगळण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा 
१) भाजीपाला, फळे, पाणी, किराणा, बेकरी, औषधी इत्यादी विक्री करणारे केंद्र चालू आहेत. या दुकानाचे मालक त्यांच्याकडे काम करणारे नोकर, हमाल, डिलिव्हरी बॉय यांना त्यांच्या दुकानाचे जरी आयडेंटी कार्ड असेल तरी परवानगी दिली आहे. फक्त संबंधित इसम त्याच व अत्यावश्यक कामाकरिता चालला आहे काय याची खात्री करावी.
२) डॉक्टर, नर्स, कंपाउंडर, दवाखान्यातील इतर स्टाफ, पोस्ट ऑफिस, एमएससीबी, दूरदर्शन, आकाशवाणी, सरकारी व खाजगी टेलिफोन कंपन्या ,त्यांचे सर्विस प्रोव्हायडर, महसूल, नगरपालिका अधिकारी /कर्मचारी, पत्रकार यांना त्यांचे डिपार्टमेंटचे आयडी कार्ड असल्यास  परवानगी आहे ते आयडेंटिटी कार्ड ग्राह्य धरावे.  ते अत्यावश्यक ड्युटीसाठी चालले किंवा ड्युटी करून परत जात आहेत याची खात्री करावी.
४) काही खाजगी संस्था एनजीओ यांना फूड पॅकेट पाणी वाटप करिता पास दिले आहेत त्यात एरिया व वेळ नमूद आहे, तसेच काही किराणा दुकानदार यांना त्यांचे घर किंवा दुकान ते जुना मोंढा पास दिला आहे, पासची खात्री करताना पासधारक दिलेल्या मार्गावरूनच आहे याची खात्री करावी. ५) अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी नागरिक यांना विनाकारण त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.
६) कोणतेही पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी नागरिकांना बाहेर जिल्ह्यात जाण्या-येण्यासाठी परस्पर पास किंवा प्रमाणपत्र देणार नाहीत याची खबरदारी घ्यावी. वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, सर्व अधिनस्त अधिकारी/कर्मचारी यांना याबाबत अवगत करावे, असे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी निर्देश दिले आहेत.

गुरुव्दाराकडून गरीबासाठी लंगर सुरु 
गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्यावतीने दोन दिवसापासून गरीब, गरजूं आणि उपाशी नागरिकांना लंगरच्या माध्यमातून अन्नदान केले जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाउन घोषित करण्यात आल्यानंतर गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदर सिंघ मिनहास, उपाध्यक्ष गुरविंदरसिंघ बावा, सचिव रवीन्द्रसिंघ बुंगई यांनी सर्व स्थानीक सदस्यांच्या सहकार्याने गोरगरीब आणि गरजूं नागरिकांना लंगर तयार करून वाटण्याचे निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी मालटेकडी, सांगवी भागात लंगरचे वितरण करण्यात आले. सोमवार (ता.३०) गुरुद्वारा संगत साहब चौफाळा भागात व अन्य काही ठिकाणी ट्रॅक्टरवर जेवण वाटण्यात आले. या वेळी बोर्डाचे सचिव रवीन्द्रसिंघ बुंगई, व्यवस्थापन समिती सदस्य देवेंद्रसिंघ मोटरावाले, सुरिंदरसिंघ मेंबर, अवतारसिंघ पहरेदार, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंघ वाधवा, रवीन्द्रसिंघ कपूर, केहरसिंघ, हरमिंदरसिंघ मदतगार, कुलतारसिंघ दफेदार व अन्य लंगर कर्मचारी उपस्थित होते. तसेच तेलंगाना येथील रहिवाशी असलेल्या आणि अडकलेल्या दोनशे विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com