नागरिकत्व कायदा मागे घ्या : कन्हैय्या कुमार 

सभेत मार्गदर्शन करतांना कन्हैय्या कुमार.
सभेत मार्गदर्शन करतांना कन्हैय्या कुमार.

पाथरी (जि. परभणी) :  देशात मोदी सरकार द्वेषाचे राजकारण करत आहे. अनेक समस्या असताना नागरिकत्व कायदा आणून लक्ष विचलित केले जात आहे. आमचा याला विरोध असून सरकारने हा कायदा मागे घेण्याचा इशारा विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार यांनी मंगळवारी (ता. २८) दिला.

देशात नागरिकत्व हक्क व संरक्षण कायदा लागू केल्याच्या निषेधार्थ पाथरी (जि. परभणी) येथे मंगळवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यसपीठावर सभेचे आयोजक आमदार बाबाजानी दुर्राणी, मुजाहेद खान, राजन क्षीरसागर,  मुंजाजी भाले, राजेश विटेकर, पंचायत समितीच्या सभापती कल्पना थोरात, नगराध्यक्ष मीना भोरे, सारंगधर महाराज,  प्रा. किरण सोनटक्के, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे, सुभाष कोल्हे, चक्रधर उगले, बाजार समिती सभापती अनिल नखाते, माधवराव जोगदंड आदींची उपस्थिती होती. 

कन्हैय्या कुमार म्हणाले, ‘‘मोदी सरकार हे द्वेषाचे राजकारण करीत आहे. देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. आज देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असताना नागरिकत्व कायदा आणून मोदी सरकार केवळ हिंदू - मुस्लिम वाद करत आहे. नागरिकत्व कायदा ह कागदावर ठरणार असून आज अनेक कुटुंबाकडे कागदपत्रच नाहीत.’’ आमचा नागरिकत्व देण्याला नाही, तर तुमच्या नागरिकत्व काढून घेण्याला विरोध असून शेवटपर्यंत त्याला विरोध करणार असल्याचा इशाराही केंद्र सरकारला त्यांनी दिला. आपल्या भाषणात कन्हैय्या कुमार यांनी मोदी व अमित शहा यांचेवर जोरदार टीका केली.

मुस्लिम विरोधी निर्णय : दुर्राणी 
प्रस्ताविकात आमदार दुर्राणी म्हणाले, आज देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना मोदी सरकार वेगळेच निर्णय घेत आहे. केंद्र सरकार केवळ मुस्लिम विरोधी निर्णय घेत आहे. मुस्लिम विरोधात निर्णय घेतल्यावर मतांचा टक्का वाढेल, असे त्यांना वाटत असले तरी तो त्यांचा गैरसमज आहे. भाजपने सत्तेत आल्यानंतर ही हिंदू - मुस्लिम वाद वाढवण्याचे काम करत आहे.
या वेळी राजन क्षीरसागर, मुजाहेद खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com