
शिरूर कासार : तालुक्यातील बावी येथे पिता-पुत्राला झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आणि संशयित आरोपी सतीश भोसले ऊर्फ खोक्याच्या अटकेच्या मागणीसाठी रविवार (ता. नऊ) शहरात मोठा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुक्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्यावरही कारवाईची मागणी करण्यात आली.