

The Power of Journalism: Revenue Dept Acts After Sakal’s 'Kuthey Talathi' Expose
Sakal
शेंदूरवादा : दैनिक सकाळच्या कुठेय तलाठी? या वृत्तमालिकेत गंगापूर तालुक्यातील महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकल्यानंतर महसूल प्रशासन खडबडून जागे झाले आहे. गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी शिवारातील शिवना नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर सोमवारी (ता. ११) दुपारी सुमारे अडीच वाजता धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन जेसीबी व दोन हायवा जप्त केले असून त्यातील एक जेसीपी व दोन हायवा तहसील कार्यालयात आणण्यात आले आहे. तर दुसरा जेसिपी तहसील कार्यालयात आणण्याची प्रक्रिया सुरू होती. या कार्यवाहीने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.