लोहारा - लाचखोरीच्या गंभीर प्रकरणात लोहारा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षकासह चार पोलिस कर्मचाऱ्यांचा लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) पर्दाफाश केला आहे.
सहआरोपी न करण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच मागणाऱ्या या पोलिसांपैकी पोलिस नाईक अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. या प्रकरणात पोलिस निरीक्षक (प्रभारी) ज्ञानेश्वर कुकलारे, पोलिस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.